घोणसे घाटात भीषण अपघात; कार पलटी, 7 जखमी
रायगड, 03 मार्च (हिं.स.)। जळगाव–पुणे–दिघी राष्ट्रीय महामार्गावर घोणसे घाटात दि.२ रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. केळेवाडी येथील तीव्र वळणावर भरधाव वेगातील MH 18 BR 1275 या क्रमांकाची कार दगडाला धडकून पलटी झाली. या अ
जळगाव–पुणे–दिघी राष्ट्रीय महामार्गावर घोणसे घाटात दि.२ रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. केळेवाडी येथील तीव्र वळणावर भरधाव वेगातील MH 18 BR 1275 या क्रमांकाची कार दगडाला धडकून पलटी झाली. या अपघातात किमान सात पर्यटक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.   जखमींमध्ये नरेंद्र महाजन (वय २६), अक्षय विजय पवार, आदित्य विजय पवार, निलेश संजय भागवत, वैष्णवी दिनेश बागुल (वय २८) व शुभम काशिनाथ मस्के (वय ३०) यांचा समावेश आहे. सर्व जखमी हे धुळे येथील रहिवासी असून महाड येथील गणपती दर्शन करून पुढे श्रीवर्धन, हरिहरेश्वर व दिवेआगर या पर्यटनस्थळी जाण्याच्या मार्गावर होते.   अपघाताचे कारण समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचे जखमींनी सांगितले. मात्र घटनास्थळी उपस्थित काही अनुभवी चालकांनी तीव्र वळण, वेग व कमी अनुभव हेही संभाव्य कारण असल्याचे मत व्यक्त केले.   अपघातानंतर जखमींना तत्काळ म्हसळा पोलीस स्टेशन यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे हलविण्यात आले.   म्हसळा पोलीस स्टेशनचे एपीआय रवींद्र पारखे यांनी पर्यटकांना आवाहन केले की, घोणसे घाट परिसरात तीव्र वळणे, उतार व अरुंद रस्ता असल्याने वाहन चालविताना वेग मर्यादा पाळावी. रात्रीच्या वेळी हायबीम दिव्यांचा वापर टाळून सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे. कोकणातील पर्यटनाचा आनंद घेताना खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.    ---------------

रायगड, 03 मार्च (हिं.स.)। जळगाव–पुणे–दिघी राष्ट्रीय महामार्गावर घोणसे घाटात दि.२ रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. केळेवाडी येथील तीव्र वळणावर भरधाव वेगातील MH 18 BR 1275 या क्रमांकाची कार दगडाला धडकून पलटी झाली. या अपघातात किमान सात पर्यटक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.

जखमींमध्ये नरेंद्र महाजन (वय २६), अक्षय विजय पवार, आदित्य विजय पवार, निलेश संजय भागवत, वैष्णवी दिनेश बागुल (वय २८) व शुभम काशिनाथ मस्के (वय ३०) यांचा समावेश आहे. सर्व जखमी हे धुळे येथील रहिवासी असून महाड येथील गणपती दर्शन करून पुढे श्रीवर्धन, हरिहरेश्वर व दिवेआगर या पर्यटनस्थळी जाण्याच्या मार्गावर होते.

अपघाताचे कारण समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचे जखमींनी सांगितले. मात्र घटनास्थळी उपस्थित काही अनुभवी चालकांनी तीव्र वळण, वेग व कमी अनुभव हेही संभाव्य कारण असल्याचे मत व्यक्त केले.

अपघातानंतर जखमींना तत्काळ म्हसळा पोलीस स्टेशन यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे हलविण्यात आले.

म्हसळा पोलीस स्टेशनचे एपीआय रवींद्र पारखे यांनी पर्यटकांना आवाहन केले की, घोणसे घाट परिसरात तीव्र वळणे, उतार व अरुंद रस्ता असल्याने वाहन चालविताना वेग मर्यादा पाळावी. रात्रीच्या वेळी हायबीम दिव्यांचा वापर टाळून सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे. कोकणातील पर्यटनाचा आनंद घेताना खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके

 rajesh pande