मध्य पूर्वेतील तणावामुळे दुबई विमानतळावर हजारो उड्डाणे रद्द
अबू धाबी , 03 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वमधील तणाव सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर दिसून येत आहे. दुबई विमानतळावर हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इराणने संयुक्त अरब अमिराती (युएई) मधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले केल्याने परिस्थ
मध्य पूर्वेतील तणावामुळे दुबई विमानतळावर हजारो उड्डाणे रद्द


अबू धाबी , 03 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वमधील तणाव सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर दिसून येत आहे. दुबई विमानतळावर हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इराणने संयुक्त अरब अमिराती (युएई) मधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले केल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र (एअरस्पेस) बंद केले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द होत आहेत.

सध्या मध्य पूर्वमधील हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विस्तृत प्रमाणात एअरस्पेस बंद असल्यामुळे अनेक फ्लाइट्स रद्द केल्या जात आहेत, तर अनेक उड्डाणांचे मार्ग बदलण्यात येत आहेत.याचा सर्वाधिक परिणाम दुबई इंटरनॅशनल विमानतळावर झाला आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या एव्हिएशन हबपैकी एक असलेला हा विमानतळ सध्या जवळपास ठप्प झाला आहे. दुबईत दररोज सुमारे १,२०० उड्डाणे होत असत; मात्र आता ही संख्या घटून केवळ २० उड्डाणांवर आली आहे. २ मार्च २०२६ रोजीची आकडेवारी दुबई विमानतळाची अत्यंत गंभीर स्थिती दर्शवते. फ्लाइटट्रेडर २४ च्या माहितीनुसार, त्या दिवशी दुबई इंटरनॅशनल विमानतळावर केवळ २० विमान हालचाली (एअरक्राफ्ट मूव्हमेंट्स) नोंदवण्यात आल्या.

गेल्या आठवड्यात विमानतळावर एकूण ५,६५४ हालचाली नोंदल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये २,८३० टेक-ऑफ आणि २,८२४ लँडिंगचा समावेश होता. उदाहरणार्थ, २७ फेब्रुवारी रोजी एका दिवसात १,२५७ हालचाली नोंदल्या गेल्या होत्या. २६ फेब्रुवारीला ही संख्या १,२४० होती, तर २५ फेब्रुवारीला १,२३६ हालचाली झाल्या होत्या.युरोप, आशिया आणि भारतातून येणाऱ्या अनेक उड्डाणांना मधेच रद्द करण्यात आले आहे किंवा तासन्तास हवेत राहिल्यानंतर परत पाठवण्यात आले आहे. सामान्यतः चोवीस तास अखंड सुरू असणारा दुबई विमानतळ सध्या कठोर निर्बंधांचा सामना करत आहे. एअरस्पेसचा वापर अत्यंत मर्यादित झाल्यामुळे येणारी आणि जाणारी दोन्ही प्रकारची उड्डाणे इतिहासातील सर्वात कमी स्तरावर पोहोचली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande