अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार - एकनाथ शिंदे
मुंबई, 03 मार्च (हिं.स.)। मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जायला निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडिओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती
dcm-eknath-shinde-


मुंबई, 03 मार्च (हिं.स.)।

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जायला निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडिओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनय याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. यासोबतच जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल असेही शिंदे यांनी विशाखा यांना सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande