भारतात आईफोन 17e लॉन्च
मुंबई, 03 मार्च (हिं.स.)। आईफोन 17e हा स्मार्टफोन भारतासह अनेक देशांत अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला असून तो आईफोन 17 मालिकेतील सर्वात किफायतशीर मॉडेल मानला जात आहे. मागील वर्षी सादर झालेल्या आईफोन 16e चा हा अपग्रेड व्हर्जन आहे. नव्या मॉडेलमध्ये A19 च
iPhone 17e


मुंबई, 03 मार्च (हिं.स.)। आईफोन 17e हा स्मार्टफोन भारतासह अनेक देशांत अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला असून तो आईफोन 17 मालिकेतील सर्वात किफायतशीर मॉडेल मानला जात आहे. मागील वर्षी सादर झालेल्या आईफोन 16e चा हा अपग्रेड व्हर्जन आहे. नव्या मॉडेलमध्ये A19 चिप, MagSafe सपोर्ट आणि Ceramic Shield 2 प्रोटेक्शनसारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यंदा कंपनीने बेस मॉडेल थेट 256GB स्टोरेजसह सादर केल्याने ग्राहकांना दुप्पट स्टोरेजचा फायदा मिळणार आहे.

या फोनमध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्यूशन 1170×2532 पिक्सेल आहे. 60Hz रिफ्रेश रेट, True Tone सपोर्ट आणि उच्च ब्राइटनेस यामुळे व्हिज्युअल अनुभव अधिक आकर्षक होतो. डिझाइनच्या बाबतीत नॉच कायम ठेवण्यात आला असून फ्रंटला Ceramic Shield 2 मुळे अधिक स्क्रॅच रेसिस्टन्स मिळते. फोनला IP68 रेटिंग असल्याने तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे.

परफॉर्मन्ससाठी यात 3nm तंत्रज्ञानावर आधारित A19 चिपसेट देण्यात आला आहे. यात 6-कोर CPU, 4-कोर GPU आणि 16-कोर Neural Engine समाविष्ट आहे. 8GB रॅमसह हा फोन iOS 26 वर कार्यरत आहे आणि Apple Intelligence फीचर्सना सपोर्ट करतो. ड्युअल सिम पर्याय, Action Button आणि सॅटेलाइट फीचर्सही यात उपलब्ध आहेत.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, मागील बाजूस 48MP Fusion कॅमेरा असून 2x ऑप्टिकल-क्वालिटी झूमची सुविधा आहे. फ्रंटला 12MP TrueDepth कॅमेरा देण्यात आला आहे. 4K Dolby Vision व्हिडिओ रेकॉर्डिंग, Night Mode आणि HDR सपोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये यात आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 7, Bluetooth, NFC आणि USB-C पोर्ट देण्यात आला आहे. MagSafe सपोर्टमुळे वायरलेस चार्जिंग आणि विविध अॅक्सेसरीजचा वापर सुलभ होतो. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये असून 512GB व्हेरिएंट 84,900 रुपयांना उपलब्ध आहे. 11 मार्चपासून विक्रीला सुरुवात होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande