जनगणनेची तयारी पूर्ण, नागरिकांनो प्रगणक व पर्यवेक्षकांना सहकार्य करा - अमरावती मनपा आयुक्त
अमरावती, 13 मे (हिं.स.)। भारतीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने अमरावती शहरातील जनगणना प्रक्रिया सुरळीत व अचूक पार पाडण्यासाठी व्यापक तयारी केली असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १८०६ प्रगणक व पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण दे
शहरात जनगणनेची तयारी पूर्ण नागरिकांनो, प्रगणक व पर्यवेक्षकांना सहकार्य करा  मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांचे आवाहन


अमरावती, 13 मे (हिं.स.)।

भारतीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने अमरावती शहरातील जनगणना प्रक्रिया सुरळीत व अचूक पार पाडण्यासाठी व्यापक तयारी केली असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १८०६ प्रगणक व पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.जनगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जात असल्याने प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोज़न केले आहे. प्रगणकांना नागरिकांशी संवाद कसा साधावा, माहिती संकलनाची प्रक्रिया कशी पार पाडावी तसेच डिजिटल प्रणालीचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे प्रगणकांना प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळाली असून जनगणना अधिक प्रभावीपणे होणार आहे. राबवण्यास मदत महानगरपालिकेच्या आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी वर्षा लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनगणनेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक देण्यात आले. त्यांना नागरिकांनी जनगणनेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

या जनगणनेत दोन टप्प्यांमध्ये माहिती संकलन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मेदरम्यान स्वगणना प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांना ३३ प्रश्न विचारण्यात येणार असून कुटुंबातील सदस्यांची माहिती, निवास व्यवस्था स्थिती यासंदर्भातील माहिती नोंदवण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त वर्षा लड्डा यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande