अमान इंडियाकडून एल्बा ब्रँड अंतर्गत नवीन सीपीबी३६ काँक्रीट बूम पंपचे अनावरण
मुंबई, 23 मे (हिं.स.)। जगप्रसिद्ध अमान इंडिया कंपनीने बाजारपेठेत नव्या व्यावसायिक पंपाची घोषणा केली आहे. ‘सीपीबी३६’ या नावाने नवा पंप ओळखला जाईल. कंपनीकडून ‘सीपीबी३५’ या हाय-परफॉर्मन्स ट्रक माऊंटेड काँक्रीट बूम पंपच्या व्यावसायिक विक्रीची घोषमा करण
मुंबई


मुंबई, 23 मे (हिं.स.)। जगप्रसिद्ध अमान इंडिया कंपनीने बाजारपेठेत नव्या व्यावसायिक पंपाची घोषणा केली आहे. ‘सीपीबी३६’ या नावाने नवा पंप ओळखला जाईल. कंपनीकडून ‘सीपीबी३५’ या हाय-परफॉर्मन्स ट्रक माऊंटेड काँक्रीट बूम पंपच्या व्यावसायिक विक्रीची घोषमा करण्यात आली आहे. हा आधुनिक पंप अमान एल्बा ब्रँण्ड अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या नवीन उत्पादनाच्या उपलब्धेमुळे कंपनीने आता भारतातील काँक्रीट बूम पंप क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या लाँन्चिंगमुळे अमान इंडियाच्या भारतातील काँक्रीट उपकरणांच्या पोर्टफोलिओचा विस्तार होत आहे. यामुळे भारतीय बांधकाम क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल.

कंपनीच्या गुजरात येथील कारखान्यात ‘सीपीबी३५’ पंपाची निर्मिती करण्यात आली आहे. या उपकरणाची रचना खास भारतातील कामाच्या परिस्थिती ध्यानात घेऊन आखण्यात आली आहे. हे उपकरण देशातील विविध प्रकल्पांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम ठरते. भारतातील कठीण आणि संमिथ्र काँक्रीट मिक्स डिझाइनसाठी हे उपकरण फायदेशीर ठरते. या मशीनमध्ये जर्मन अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात स्विस अचूकतेचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे.

‘सीपीबी३६’ हे उपकरण पायाभूत सुविधांच्या कामांना सहाय्यक ठरेल, अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. सध्या मोठ्या संख्येने पायाभूत सुविधांचा विकास सुरु आहे. त्यामुळे या उपकरणाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. औद्योगिक बांधकाम आणि निवासी गृहनिर्माण प्रकल्पांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण ठरेल. हे मशीन पूर्ण कार्यक्षमतेने आणि विश्वासार्हतेने काम करते. यामुळे कामाचा वेग वाढतो आणि वेळेची बचत होते. हे मशीन सहज हाताळता येते.

नव्या मशीनच्या अनावरणाबद्दल अमान इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज पांडा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. विकासाचा हा वेग ध्यानात घेता बाजारात जलदरित्या काम करणा-या आणि जास्त उत्पादकता देणा-या आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी वाढू लागली आहे. आमच्याकडून ‘सीपीबी३६’ ची उपलब्धता होणे हे आमच्या भारतीय बांधकाम क्षेत्राच्या गरजेनुसार जागतिक दर्ज्याचे तंत्रज्ञान आणण्याच्या वचनबद्धतेची साक्ष देते. हा आधुनिक पंप उत्कृष्ट कामगिरी, इंटेलिजेंट कंट्रोल्स आणि मजबूत रचनेसाठी ओळखला जातो. यामुळे कंत्राटदारांना कामाचा दर्जा सुधारण्यास आणि एकूण खर्च कमी करण्यास मदत होईल. हे नवीन उत्पादन आमच्या काँक्रीट उपकरणांच्या श्रेणीला मजबूती देईल, असा आम्हांला विश्वास आहे.”

भारतामध्ये वेगाने पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. यामध्ये मेट्रो, महामार्ग, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, शहरी पायाभूत सुविधा आणि निवासी प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व बांधकामांच्या वाढीमुळे आधुनिक काँक्रीट उपकरणांची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेत कंपनीने हे नवे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध केले आहे. अमान इंडियाचे देशभरात २३ विक्री आणि सेवा कार्यालये आहेत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना हा पंप सहज खरेदी करता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande