हमजा बुरहानच्या अंत्यसंस्कारात आयएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
पाकिस्तानचे दहशतवादी कनेक्शन पुन्हा एकदा उघड इस्लामाबाद, 23 मे (हिं.स.) : पाकिस्तान आणि दहशतवाद हे कनेक्शन पुन्हा एकदा जगापुढे आले आहे. कुख्यात जिहादी दहशतवादी हमजा बुरहान याच्या पार्थिवावर शनिवारी इस्लमाबाद येथे अंत्यसंस्कार झाले. यावेळी कुख्यात द
हमजाच्या अंत्ययात्रेचे व्हायरल फोटो


पाकिस्तानचे दहशतवादी कनेक्शन पुन्हा एकदा उघड इस्लामाबाद, 23 मे (हिं.स.) : पाकिस्तान आणि दहशतवाद हे कनेक्शन पुन्हा एकदा जगापुढे आले आहे. कुख्यात जिहादी दहशतवादी हमजा बुरहान याच्या पार्थिवावर शनिवारी इस्लमाबाद येथे अंत्यसंस्कार झाले. यावेळी कुख्यात दहशतवाद्यांसह पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी देखील उपस्थित होते. बुरहान हमजा पहलगाम हल्ल्याचा मास्टर मांईंड होता. त्याची पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) येथे अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

हमजाच्या अंत्यसंस्कारात हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीन तसेच अल-बद्र संघटनेचा प्रमुख बख्त जमीन खान यांच्यासह पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या अनेक वाँटेड दहशतवाद्यांची उपस्थित होते. हमजा बुरहान याला अर्जुमंद गुलजार डार या नावानेही ओळखले जात होते आणि त्याचे कोडनेम “डॉक्टर” असे होता. पीओकेमध्ये हत्या केल्यानंतर त्याच्या पार्थिवाचे इस्लामाबादमध्ये दफन करण्यात आले.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंनुसार या अंत्यसंस्कारात दहशतवादी संघटनांच्या सदस्यांव्यतिरिक्त पाकिस्तानच्या आयएसआशी संबंधित काही अधिकारीही उपस्थित होते. व्हिडिओमध्ये अनेक जण अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज दिसत होते. त्यांच्या हातात एके-47 रायफल्स आणि इतर आधुनिक शस्त्रे होती. तसेच, बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित सशस्त्र सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. यापूर्वी मे 2025 मध्येही भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करी अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मोठे दहशतवादी सहभागी झाले होते.

जिहादी दहशतवादी हमजा बुरहान हा 2019 मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक मानला जातो. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 40 हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्यामुळे भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने 2022 मध्ये त्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून अल-बद्र संघटनेसाठी कट्टरवादाचा प्रसार करणे, युवकांची भरती करणे आणि आर्थिक मदत पुरवणे यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये शिक्षकाच्या नावाखाली लपून राहत होता.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादपासून सुमारे 135 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुजफ्फराबादमधील एका खासगी महाविद्यालयात तो प्राचार्य म्हणून कार्यरत होता. गुरुवारी सकाळी महाविद्यालय परिसरातून बाहेर पडताच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात अनेक गोळ्या लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला.----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande