
रायगड, 23 मे (हिं.स.)I
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी ओळख वाढवून वाढदिवसाच्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप आरोपीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत शिक्षण घेत असताना आरोपी वारंवार तिच्या शाळेत येत होता. तो तिचा सतत पाठलाग करत त्रास देत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला भीती आणि दबावाखाली असलेल्या मुलीशी आरोपीने हळूहळू मैत्री निर्माण केली. काही दिवसांनी आरोपीने वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवत तिला बाहेर नेले.
यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित मुलगी मानसिक धक्क्यात गेली असून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५०/२०२६ नोंद करण्यात आला असून बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, १२ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२)(i), ६४(२)(m), ७८ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून अधिक तपास मपोसई/जाधव ह्या करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)