
लातूर, 23 मे (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई केली. किनगाव पोलीस ठाणे हद्दीतील खंडकी शिवार येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ८ लाख ४८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..
तसेच मटका-जुगार, अवैध दारू विक्री, अवैध वाळू उपसा आदी प्रकरणांत एकूण ४२ गुन्हे दाखल करून ६६ इसमांवर कारवाई करण्यात आली. सर्व कारवायांमध्ये ६३ लाख ९२ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलिस विभागाने ‘खबऱ्या’ हेल्पलाईन ९१ ५० १०० १०० सुरू केली असून, नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis