आयसीसी एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवीन नियम लागू करण्याच्या विचारात
नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद २०२७ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या नियमांवर ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि मंजु
आयसीसी लोगो संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद २०२७ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या नियमांवर ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर ते लवकरच लागू केले जाऊ शकतात.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि अनेक फ्रँचायझी लीगमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षक क्रिकेटपटूंशी थेट संवाद साधण्यासाठी मैदानावर जातात. पण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा नियम अद्याप अस्तित्वात नाही. सध्या, एकदिवसीय सामन्यांमध्ये ड्रिंक्स ब्रेक दरम्यान प्रशिक्षकाचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ बदली खेळाडूच मैदानावर जातात आणि त्यांना क्रिकेट किट घालणे बंधनकारक असते.

आयसीसी आता या नियमात बदल करण्याचा विचार करत आहे. प्रस्ताव असा आहे की, टी-२० क्रिकेटप्रमाणेच, एकदिवसीय क्रिकेटमध्येही ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षक खेळाडूंशी थेट संवाद साधण्यासाठी मैदानावर जाऊ शकतील. तथापि, प्रशिक्षक सरावाची जर्सी घालतील की क्रिकेटपटूंप्रमाणे संघाच्या अधिकृत जर्सीमध्ये मैदानात उतरतील, हेदेखील ठरवले जाईल.

मुख्य प्रशिक्षकाच्या नियमाव्यतिरिक्त, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ तास १० मिनिटांच्या अंतराने दोन अधिकृत ड्रिंक्स ब्रेक सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. या सर्व सूचना आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) आभासी बैठकीत सादर करण्यात आल्या. या नियमांवर ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या बैठकीत सर्व संबंधितांशी चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande