
लातूर, 24 मे (हिं.स.)।
उद्योग भवन परिसरास स्पेशल एज्युकेशन झोनची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपूरावा करणार, अशी ग्वाही डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांची ट्यूशन एरियातील व्यवसायीकांना दिली. तसेच लातूर पॅटर्न बचाव कृती समिती सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेणार, असेही त्यांनी सांगितले.
निट पेपर फुटी नंतर उद्योग भवन परिसरात असलेल्या ट्यूशन एरियातील जागेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. शिक्षणाचा लातूर पॅर्टण निर्माण करण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिलेलेअसून यामध्ये या परिसरातील शिकवणी चालकांसह व्यवसायिकांचा वाटा आहे. मात्र आता याचशिकवणी चालकांसह व्यावसायीकांच्या जागेचा मुद्दा लातूर पॅर्टणचा नावलौकीक ठेवण्यासाठीअडसर ठरत आहे. लातूरची अर्थव्यवस्था या परिसरावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळेया परिसराची स्पेशल ऐजूकेशन झोन ची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करु अशी ग्वाहीडॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी दिली आहे.
जिल्हा उद्योगकेंद्राने ट्यूशन एरियातील शिकवणी चालकांसह हॉस्टेल चालक व छोट्या मोठ्या व्यवसायीकांना नोटीस बजावून आपल्या आस्थापना बंद कराव्यात अशी नोटीस दिली आहे. त्यामुळे हे सर्वजण हवालदिल झाले असल्याने त्यांनी लातूर पॅटर्न बचाव कृती समिती ची स्थापना केली आहे. या कृती समितीच्या झालेल्या बैठकीत संवाद साधताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर बोलत होत्या.
यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपाचे सरचिटणीस प्रवीण कस्तुरे,नगरसेवक विनय जाकते, ऋषीकेश राजे, राजश्री धोत्रे, मिना गायकवाड, प्रविण सावंत, पुनीतपाटील, ओम धरणे आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis