मोदी सरकारच्या तपपूर्ती निमित्त सोमवारी विशेषांकाचे प्रकाशन
* मुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती मुंबई, 24 मे (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील यशस्वी 12 वर्षे पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक आणि दैदिप्यमान पर्वानिमित्त ‘राष्ट्र निर्
मोदी सरकारच्या तपपूर्ती निमित्त सोमवारी विशेषांकाचे प्रकाशन


* मुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, 24 मे (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील यशस्वी 12 वर्षे पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक आणि दैदिप्यमान पर्वानिमित्त ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन सोमवार, दि. 25 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याच्या घटनेला एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पूर्वसंध्येला प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 4 वाजता हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विशेषांकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या 12 वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande