जळगाव - १५ हजारांची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, 07 जुलै (हिं.स.) - सातबारा उताऱ्यावरील नोंद दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ही
जळगाव - १५ हजारांची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात


जळगाव, 07 जुलै (हिं.स.) - सातबारा उताऱ्यावरील नोंद दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.तक्रारदारांच्या वडिलोपार्जित घराच्या कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्यामुळे त्यांच्या वडिलांचे नाव सातबारा उताऱ्यावरून वगळण्यात आले होते. याविरोधात तक्रारदारांनी भूमी अभिलेख विभागाकडे अपील दाखल केले होते. सुनावणीनंतर संबंधित फेरफार रद्द करून वडिलांचे नाव पुन्हा सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्रारदारांनी डिसेंबर २०२५ आणि जून २०२६ मध्ये अर्ज केले होते. मात्र, काम प्रलंबित राहिल्याने त्यांनी कार्यालयात पाठपुरावा केला.

त्यावेळी भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी काम करून देण्यासाठी “साहेबांसाठी १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये”, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जितेंद्र पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande