परभणी - समर्थ चेस अकॅडमीच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
परभणी, 07 जुलै, (हिं.स.)। येथील समर्थ चेस अकॅडमीच्या दोन युवा बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 11 वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या यशामुळे दोन्ही खेळाडूंना परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याच
समर्थ चेस अकॅडमीच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड


परभणी, 07 जुलै, (हिं.स.)। येथील समर्थ चेस अकॅडमीच्या दोन युवा बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 11 वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या यशामुळे दोन्ही खेळाडूंना परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

मुलींच्या गटात सह्याद्री घाटगे हिने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रवेश निश्रि्चत केला, तर मुलांच्या गटात कृष्णा राका याने अव्वल क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान संयम, कौशल्य आणि उत्कृष्ट डावपेचांचे प्रदर्शन करून यश संपादन केले.

सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर मिळालेल्या या यशामुळे परभणीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे दोन्ही खेळाडू जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल समर्थ चेस अकॅडेमीचे प्रशिक्षक अनुराज रासकटला यांनी सह्याद्री घाटगे आणि कृष्णा राका यांचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडूंच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी पालकांचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande