‘प्रहार’ या हिंदी चित्रपटामधून उलगडणार ॲड. उज्ज्वल निकम यांचा संघर्षमय प्रवास
सोलापूर, 07 जुलै (हिं.स.)। देशातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ हा हिंदी चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ॲड. निकम यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते राजकुमार
sdfg


सोलापूर, 07 जुलै (हिं.स.)। देशातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ हा हिंदी चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ॲड. निकम यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते राजकुमार राव यांनी साकारली असून, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतरची न्यायालयीन लढाई आणि मुख्य आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले यांच्या निवासस्थानी ॲड. निकम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत ‘प्रहार’ चित्रपटाची माहिती दिली तसेच चित्रपटाचा ट्रेलरही दाखविला.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी घेतलेल्या मुलाखतीत ॲड. निकम म्हणाले, “‘प्रहार’ हा केवळ माझ्या जीवनावर आधारित चित्रपट नाही, तर न्यायव्यवस्था, देशभक्ती आणि दहशतवादाविरोधातील कायदेशीर लढ्याचा दस्तऐवज आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून पाहावा.”

यावेळी वर्षाताई चौगुले आणि हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटीच्या अध्यक्षा अंजली माशाळकर यांनी औक्षण करून ॲड. निकम यांचे स्वागत केले. नागेश चौगुले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच अंजली माशाळकर यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्याबद्दल समाधान व्यक्त करत ॲड. निकम यांनी सोसायटीला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास डॉ. सूर्यप्रकाश कोठे, सचिव सिद्धेश्वर श्रीगादी, कोषाध्यक्ष काशिनाथ बिराजदार यांच्यासह सोसायटीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande