एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) पीसीबी अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयची माफी मागितली. मोहसिन यांनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ते आशिया कप ट्रॉफी भारताला परत करण्यास नकार देत आहेत. त्यांनी भारतीय कर्णधार
भारतीय संघ आणि मोहसीन नक्वी


नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) पीसीबी अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयची माफी मागितली. मोहसिन यांनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ते आशिया कप ट्रॉफी भारताला परत करण्यास नकार देत आहेत. त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने वैयक्तिकरित्या एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घ्यावी अशी मागणी केली आहे. याचा अर्थ ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद अजूनही शमलेला नाही.

भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आणि नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद जिंकले. भारतीय संघाच्या विजयानंतर ट्रॉफीवरून तीव्र वाद निर्माण झाला, जो अद्याप शमला नाही.

भारतीय संघाने पीसीबी आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वींकडून आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. मोहसीन बराच वेळ स्टेजवर उभे राहिले आणि भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोहसीन नक्वी स्टेजवरून उतरले आणि ट्रॉफी आणि पदके थेट त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले.

त्यानंतर भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केला आणि ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. नंतर बीसीसीआयने पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना ट्रॉफी ताबडतोब परत करण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर आयसीसीकडे तक्रार करण्याची धमकी दिली.

३० सप्टेंबर रोजी झालेल्या एसीसीच्या व्हर्च्युअल बैठकीत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये जोरदार वाद झाला. त्यादरम्यान मोहसीन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली. पण ते भारताला आशिया कप ट्रॉफी न देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

नक्वी यांनी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ट्रॉफी घेण्यासाठी एसीसी कार्यालयात वैयक्तिकरित्या आला तर ते ट्रॉफी सोपवतील असे सांगितले. बीसीसीआयने असे उत्तर दिले की, ते ट्रॉफी घेण्यासाठी येणार नाहीत. तुम्ही तिथे असताना त्यांनी ट्रॉफी घेतली नव्हती, मग तुम्हाला वाटते का ते आता घेतील?

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande