माझ्यात स्कंदमातेच्या गुणांचं प्रतिबिंब आहे – अभिज्ञा भावे
मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। ''तारिणी'' मालिकेमधील कौशिकी हे पात्र जितकं नीतीमूल्यांवर चालणारं आहे, तितकीच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील वास्तव जीवनात खरीखुरी, प्रामाणिक, मातृत्व भावना आणि संवेदनशील स्वभावाची आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने, अभ
माझ्यात स्कंदमातेच्या गुणांचं प्रतिबिंब आहे – अभिज्ञा भावे


मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। 'तारिणी' मालिकेमधील कौशिकी हे पात्र जितकं नीतीमूल्यांवर चालणारं आहे, तितकीच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील वास्तव जीवनात खरीखुरी, प्रामाणिक, मातृत्व भावना आणि संवेदनशील स्वभावाची आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने, अभिज्ञाने तिच्या जीवनमूल्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते - आईपण, करुणा आणि निस्वार्थीपणा ही तिची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत आणि ती माझ्यातदेखील मी अनुभवते. हे गुण माझ्यात आधीपासूनच होते, पण जेव्हा मी गरजू लोकांशी संवाद साधू लागले, तेव्हा मला जाणवलं की त्यांना मदत करताना, कुठलाही स्वार्थ न ठेवता मी त्यांच्या पाठीशी उभी राहते. हीच खरी निस्वार्थी सेवा आहे. मानवांप्रमाणेच प्राण्यांविषयीही तितकीच संवेदनशील आहे. मी कधीही मांसाहार केला नाही आणि माझ्यातली आईपणाची भावना प्राण्यांप्रती देखील आहे, बालपणात मी म्हण ऐकली होती ‘अज्ञानात सुख असतं’, पण जस मला कळू लागलं तेव्हा समजल कि मी कधी ही, कोणाचं दु:ख पाहून दुर्लक्ष करूच शकत नाही. मी नेहमी जागृत आणि सजग राहून जगते. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात, जेव्हा अनेक जण सोयीचा मार्ग निवडतात, तिथे मी कधीही सोपं वाटणारं, पण चुकीचं पाऊल उचलणार नाही. जरी योग्य मार्ग कठीण असला, तरी मी तोच मार्ग निवडते. मी माझ्या जीवनशैलीत देखील अनेक बदल केले आहेत जसं की, गाडीमध्ये प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्या ठेवणं, शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळणं, अधिकाधिक झाडं लावणं, आणि पर्यावरणाचं भान ठेवणं. माझ्या अंत्यक्षणी मला स्वतःकडे पाहून अभिमानाने म्हणता येईल की, मी योग्य निर्णय घेतले, जरी ते कठीण होते, तरी मी माझ्या मूल्यांशी कधीच प्रतारणा केली नाही. अभिज्ञा भावेने ‘कौशिकी’ या पात्रात साकारलेली नीतिमत्ता आणि प्रत्यक्ष आयुष्यात दाखवलेली जबाबदारी यामुळे ती खऱ्या अर्थाने आजच्या काळातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरते.

कौशिकीला तारिणी मालिकेत सोम- शुक्र रात्री ९: ३० वा. बघायला विसरू नका सदैव तुमच्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande