अकोला, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करून समाज आणि राष्ट्र निर्माण मध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं पंडित दीनदयाल उपाध्याय पासून तर अटल बिहारी वाजपेयी ते शामाप्रसाद मुखर्जी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सारखे लोकनेते समाजाला दिशा देणारे कार्यकर्ते निर्माण केले. त्यामुळे शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या संघटनेच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्मता मानवतावाद आणि संघाची भूमिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार, परम पूज्य गोवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस रजू भैया सुदर्शन जी मोहनजी भागवत सरसंघचालक यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
संघाचे संस्कार या विषयावर संमेलन ठेवून सेवा समर्पण विश्वास 15 वाडा यशस्वी केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.भारतीय जनता पक्ष कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय सगोष्टी, जीएसटी प्रबुद्ध संमेलन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन चरित्रावर प्रदर्शनी चे लोकार्पण उद्घाटन करताना व विषयावर वेगवेगळ्या नागरिकांची संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसणे हे होते तर मंचावर जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल, वक्ते सिद्धार्थ शर्मा महावितरण कंपनीचे संचालक विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी आशिष ,चाद राणा , विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष निकेश गुप्ता विजय अग्रवाल किशोर पाटील माधव मानकर राजेश नागमते मनीष गावंडे, देवाशिष काकड वैशाली शेळके अंबादास उमाळे आम्रपाली उपरवट, रमेश अल्करी संजय गोटफोडे, पवन महल्ले आदी मंचावर विराजमान होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज डाक,ग तिकीट आणि शंभर रुपयाचे नाणे लोकार्पण सोहळा कोण राष्ट्रीय सेवा संघ आणि भारत मातेची प्रतिमा देशाच्या स्वातंत्र्य काळानंतर प्रथमच नाणे आणि तिकीटवर प्रकाशित करून राष्ट्रभक्तांचा सन्मान केल्याची यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन चरित्रावर सिद्धार्थ शर्मा यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
जीएसटी लागू करण्याच्या आधी सरकारने 14 प्रकारचे काँग्रेसच्या राज्यात असलेले कर रद्द केले आणि जीएसटी प्रणाली सुरू केली आणि या प्रणालीमुळे येणाऱ्या अडचणीचा सर्व क्षेत्राची नागरिकांशी व्यापाऱ्यांशी संवाद करून त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल केलं आणि आता तीन प्रकारचे टॅक्स करून जीवनावश्यक वस्तू सोबत अनेक जीवना उपयोगी वस्तू स्वस्त करण्याचा सरकारने प्रयत्न करून स्वदेशी विचारांना प्राधान्य दिला आहे टीका करणारे काँग्रेस सांगतात की अकरा वर्षात का केलं तर अकरा वर्षात जीएसटी मध्ये अनेक बदल केले अनेक वेळा टॅक्स कमी केले जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असली तरी जीएसटी ही प्रणाली लागू करून व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना लागणारा कर हा कमी केल्यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढत असताना भारतात वाढली नाही, व्यापाऱ्यांना होणारा त्रास इन्स्पेक्टर राज याच्यातून मुक्तता मिळाली अशी याप्रसंगी जीएसटी या विषयावर जीएसटी चे फायदे आणि जीएसटी उत्सव का याचा विवेचन करताना आशिष चाद राणा यांनी आकडेवारी मांडली आणि उपस्थितीना याचा प्रचार प्रसार करण्याची विनंती केली यावेळी खासदार अनुप, धोत्रे यांनी स्वदेशी विचारधारांना महत्त्व देऊन स्वदेशी वस्तू याचा प्रचार व वापर नागरिकांनी करून या देशांमधील लघु उद्योगांना व आपल्या व्यवसायिकांना प्रोत्साहन करून हा देश आत्मनिर्भरनिर्भर कडे जाऊ शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सैनिकातील वस्तू सोबत अनेक रेल्वे इंजिन वंदे भारत सारखी ट्रेन आपल्या देशांनी निर्माण करून त्याचा निर्यात करत आहे आणि अनेक विषयावर निर्यात मध्ये वाढ करून देश हा स्वाभिमानी आणि कलाकारांचा देश असल्याचा सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले महात्मा गांधी यांच्या जयंती पासून भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आपण शिवराज्य सुराज्य आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करून येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्या भागातील व्यापारी सहज कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम करावे अशी विनंती खासदार अनु धोत्रे यांनी केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनात चरित्रावरील 65 वेगवेगळे चित्र स्थानिक चित्रा टॉकीज जवळील बालाजी मंदिर परिसरावर लावण्यात आली या चा उद्घाटन खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे हस्ते झाले या प्रदर्शनीला 5000 पेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे