अकोला, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने मनपा निवडणूका लवकरच लागतील याची तयारी केली आहे त्या अनुषंगाने अकोला महानगर काँग्रेस कमिटी कामाला लागली असून आज अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना अकोला निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते आज अकोला पूर्व क्षेत्रात मनपा निवडणूक मध्ये काँग्रेस ची भूमिका काय असणार? आणि तयारी कुठपर्यंत आली? याचा आढावा घेण्यासाठी अकोल्याला आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर एकसंघ राहून कोणताही निर्णय घ्या, आणि मनपा मध्ये सत्ताधारी व्हा असे आवाहन डॉ. सुनील देशमूख यांनी केले.
अकोला महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये अकोला पूर्व विधानसभा क्षेत्रात येत असलेले मनपा चेप्रभाग क्र.3,4,5,6,10,14,17,आणि 20 मधील काँग्रेस पक्षाचे माजी उमेदवार यांच्याकडून काँग्रेस पक्षाची आजची स्थिती जाणून घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी सोबतच निवडणूक मैदानात उतरण्यावर भर दिला. आणि पूर्व मधील काँग्रेस चा प्रत्येक कार्यकर्ते निवडणूकला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास दिला. शेवटी पक्ष निरीक्षक डॉ. सुनील देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांचे मत प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या पर्यंत पोहचवीण्याचे आणि काँग्रेस पक्षाला ही निवडणूक कशी सोपी होईल यांचे नियोजन करण्याचा विश्वास दिला. यावेळी प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे,माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर,महेश गंणगणे, महेंद्र गवई,. मधुसूदन भटकर,अक्षय राऊत, कपिल रावदेव, महानगर पूर्व अध्यक्ष दत्ता देशमुख, संदेश वानखडे, प्रशांत प्रधान नीलकंठराव पाचपोहे विनोद नालट देविदास नेमाडे सोमेश डिगेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे