अकोला - अतिवृष्टीमुळे 29 हजार 327 हे. क्षेत्राचे नुकसान
अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। अकोला जिल्ह्यात दि. 16 व 29 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे 111 गावे बाधित असून,29 हजार 327 हे. क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. जिल्ह्यात मुख्यत्वे कापूस, सोयाबीन व तूर पीकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले आह
अकोला - अतिवृष्टीमुळे 29 हजार 327 हे. क्षेत्राचे नुकसान


अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। अकोला जिल्ह्यात दि. 16 व 29 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे 111 गावे बाधित असून,29 हजार 327 हे. क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. जिल्ह्यात मुख्यत्वे कापूस, सोयाबीन व तूर पीकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

तालुका कार्यालयांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी एकत्रित अहवाल विभागाला पाठवला आहे. त्यानुसार या कालावधीत बार्शीटाकळी तालुक्यातील 16 गावे बाधित असून, कापूस, सोयाबीन व तूर पीकाखालील 4 हजार 800 हे. क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

अकोट तालुक्यातील 18 गावांतील कापूस, सोयाबीन व तूर पीकाखालील 2 हजार 481 हे., तेल्हारा तालुक्यात 15गावांतील 6 हजार 661 हे. क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

बाळापूर तालुक्यात 22 गावांतील कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकाखालील 3 हजार 485 हे. क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यात 30 गावांमध्ये कापूस, सोयाबीन व तूर पीकाखालील 11 हजार 900 हे. क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande