अकोला : धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन
अकोला, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमंलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर समाज पेटून उठलेला आहे. आडसुळ येथे समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून याच मागणीसाठी आडसुळ येथील शेगाव राष्ट्रीय महामार्गावर
प


अकोला, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमंलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर समाज पेटून उठलेला आहे. आडसुळ येथे समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून याच मागणीसाठी आडसुळ येथील शेगाव राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज रास्ता रोको आंदोलनात उतरले. समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला राज्य शासनाकडून बगल दिली जात आहे.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमंलबजावणी करण्यात यावी , या मागणीसाठी १ ऑक्टोबर रोजी आडसुळ येथे शेगाव राष्ट्रीय महामार्ग वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तेल्हारा तालुक्यातील धनगर समाजातील शेकडो नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत समाजाला आरक्षण प्राप्त होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande