अकोला, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : पोलीस स्टेशन पिंजर येथे तक्रारदार फिर्यादी अनुराधा अनिल महल्ले राहणार दुधलम यांनी पोस्टेला येऊन रिपोर्ट दिला की, दिनांक 16 ऑगस्टच्या रात्री ते त्यांच्या जेठानी यांच्या घरी झोपायला गेले होत्या. सकाळी परत आल्यावर त्यांना त्यांचे स्वयंपाक खोलीचे कुलूप तुटलेले दिसले, त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांचे लोखंडी कपाटातील सोने, चांदीचे दागिने व नगदी 5000/- रुपये असा एकूण 13,600 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेले वगैरे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन पिंजर अपराध नंबर 218/25 कलम 305 (a) 331 (4) BNS. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिली.
सदर गुन्ह्याचे तपासा बाबत पोलीस अधिक्षक अर्चित चांडक , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात तात्काळ तपास पथक तयार करून आरोपी नामे सुनील श्रीकृष्ण काकड वय 45 वर्ष राहणार दाताळा तालुका मुर्तीजापुर यास दिनांक 29/09/25 रोजी अटक करून त्याच्याकडे तपास करून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल 1) 05 ग्राम सोन्याची पोत, 2) 03 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, 3) चांदीचा करंडा व 2 देव, 4) 2 मोबाईल गुन्ह्यात वापरलेले, 5) पोस्टे माहुली जिल्हा अमरावती ग्रामीण येथील चोरीची मोटरसायकल क्रमांक MP 48 ZC 6791 असा एकूण 58600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाआहे. सदरची कारवाई पो.स्टे. पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे, ASI 1191 चव्हाण HC. नागसेन वानखडे, HC चंद्रशेखर गोरे Pc वैभव मोरे, Hg नजीर हुसेन Hg अय्याज खान, hg शरद पवार यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे