अकोला -ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रकाश आंबेडकरांची सरकारकडे मागणी
अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट तीव्र असतानाही सरकारने तो अद्याप जाहीर केलेला नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते आज अकोल्यात बोलत होते. त्यांनी सरकारवर थेट हल्ला चढवि
प


अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट तीव्र असतानाही सरकारने तो अद्याप जाहीर केलेला नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते आज अकोल्यात बोलत होते. त्यांनी सरकारवर थेट हल्ला चढवित हे सरकार चोर सरकार आहे असे म्हटले. आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर केला तर सर्वप्रथम खावटी जाहीर करावी लागते. त्यामुळे वाटप थांबवण्यासाठी आणि टेंडरमधून पैसा खाण्याची संधी कमी होऊ नये म्हणून सरकार जाणीवपूर्वक दुष्काळ जाहीर करत नाही. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देऊ असे सांगणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की नुकसान भरपाई फक्त दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच देता येते.”

सरकारच्या धोरणांवर टीका करत आंबेडकर म्हणाले, “सत्ताधाऱ्यांचे चरित्र बघा, त्यांनी सातबारा कोरा का केला नाही याचे उत्तर द्यावे. कर्जमाफी केली तर बँकेचे कर्ज सरकारला फेडावे लागेल आणि त्यामुळे त्यांचा मलिदा कमी होईल.” त्यांनी आणखी सांगितले की, “पत्रात खावटी वाटप आणि दुष्काळ जाहीर करण्याचा उल्लेख आहे, तरीही आतापर्यंत सरकारने ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा खुलासा करावा. एका जीआरमध्ये यासंदर्भात स्पष्ट उल्लेख आहे.” मतदारांवर टीका करत ते म्हणाले, “मतदार स्वतःशी प्रामाणिक नाही, तो जात आणि धर्माशी प्रामाणिक आहे. त्यामुळे न्याय मिळणे कठीण झाले आहे. जात-धर्म बघून मतदान करणे थांबवा आणि शहाणे व्हा.

राजकीय समीकरणांवर भाष्य करत आंबेडकर म्हणाले, “भाजपला सोडून आम्ही सर्वांसोबत एकत्र यायला तयार आहोत. काँग्रेसने आमच्याबद्दल काय अडचण आहे ते स्पष्ट करावे.” ठाकरे बंधूंविषयी ते म्हणाले, “मी कोणालाही शुभेच्छा देत नाही.” त्यांनी जनतेला आवाहन केले, “या सरकारकडे आता कायमचे दुर्लक्ष करा.” सत्तेची उलथापालथ करणे हाच आमचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आंबेडकरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरणात चांगलाच खळबळ माजली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande