अमरावतीमध्ये 1.90 कोटींचा जप्त गांजा, एमडी मुद्देमाल नष्ट
अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) :शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस अॅक्ट 1906 अंतर्गत दाखल 47 गुन्सतील जप्त 896.817 किलोग्राम गांजा किंमत 1,79,36,340 (एक कोटी एकोण अंशी लाख, छत्तीस हजार तीनशे चाळीस रुपये) जप्त केला होता. तसेच 05 गु
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात ५२ गुन्ह्यात जप्त  1.90 कोटींचा जप्त गांजा, एमडी मुद्देमाल नष्ट


अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) :शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस अॅक्ट 1906 अंतर्गत दाखल 47 गुन्सतील जप्त 896.817 किलोग्राम गांजा किंमत 1,79,36,340 (एक कोटी एकोण अंशी लाख, छत्तीस हजार तीनशे चाळीस रुपये) जप्त केला होता. तसेच 05 गुन्ह्यातील 215 ग्रॅम एम डी अंमली पदार्थ किंमत 10,75,250 ( दहा लाख, पंच्च्याहत्तर हजार, दोनशे पन्नास, रूपये) जप्त केलीहोती. दोन्ही मिळून 52 गुन्ह्यातील अंमली पदार्थ मुद्येमाल एकूण 1,90,11,590 (एक कोटी, नव्वद लाख, अकरा हजार, पाचशे नव्वद, रूपये) रूपयांचा जप्त मुद्देमाल सोमवारला केंद्रीय गोडावून पोलिस आयुक्त कार्यालय अमरावती येथून महाराष्ट्र एनवायरो पावर लिमीटेड,बुटीबोरीएमआयडीसी. जि. नागपुर येथे इन्सिनेटरच्या मदतीने जाळून नष्ट करण्यात आला.यामध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सन 1996 पासून दाखल असलेल्या 1) पोलीस ठाणे नागपुरी गेट येथील 26 केसेस, 2) पोलीस ठाणे बडनेरा येथील 8 केसेस, 3) पोलीस ठाणे गाडगेनगर येथील 11 केसेस 4) पोलीस ठाणे खोलापुरी गेट येथील 3 केसेस 5) पोलीस ठाणे नांदगाव पेठ येथील 2 केसेस 6) पोलीस ठाणे फेजरपुरा येथील 1 केसेस 7) पोलीस ठाणे वलगाव येथील 1 केसेस याप्रमाणे एकूण 52 प्रकरणाचा समावेश होता.

या सर्व प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागलेला असल्याने गांजा व एमडी मुद्देमाल नाश करण्याकरीता पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), तसेच शाम घुगे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र 2 अशी त्रिसदस्यीय ड्रग डीस्पोजल कमीटी स्थापन करण्यात आली होती. सदर ड्रग डीस्पोजल कमीटीच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबई यांचेकडून गांजा व एमडी मुद्देमाल नाश करण्याकरीता परवानगी प्राप्त करण्यात आली.त्यांनी महाराष्ट्र एनवायरो पावर लिमीटेड, बुटीबोरी एमआयडीसी, जि. नागपुर या ठिकाणी सदर गांजा व एमडी मुद्दे माल नाश करण्याची परवानगी दिली होती. त्याप्रमाणे 29 सप्टेंबर 2025 रोजी सदर संपुर्ण 52 प्रकरणामधील गांजा व एमडी मुद्देमाल वरील ठिकाणी ड्रग्स डीस्पोजल कमीटी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र एनवायरो पावर लिमीटेड चे मॅनेजर, दोन पंच व आणि पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समक्ष कंपनीमध्ये इंसीनेटरच्या मदतीने जाळून नष्ट करण्यात आला.सदर कार्यवाही अरविद चावरिया, पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशाने रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) तसेचशामघुगे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र.2. शिवाजी बचाटे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अमरावती शहर येथील श्रीमती सिमा दाताळकर पोलीस निरीक्षक, योगेश इंगळे सहायक पोलीस निरीक्षक, स.पो.उपनि, कैलास सानप, पो.हे.कॉ. अजय मिश्रा, सुधीर गुडधे, सभांजी केद्रे, चालक नितीन लांडगे, यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande