नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने राष्ट्रीय महामार्ग -715 च्या कालीबोर-नुमालीगड विभागातील विद्यमान कॅरेजवेचे चौपदरी रुंदीकरणाला मंजुरी दिली. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पट्ट्यातील प्रस्तावित वन्यजीव अनुकूल उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा यात समावेश आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने विकसित केला जाणार असून, त्याची एकूण लांबी 85.675 किमी आहे, आणि त्यासाठी एकूण 6957 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महामार्ग-715 (जुना राष्ट्रीय महामार्ग -37) च्या सध्या वापरात असलेल्या कालिबोर-नुमालीगड विभागात दुपदरी रस्ता असून, त्याचे डांबरीकरण आहे/नाही. हा रस्ता जाखलाबंधा (नागाव) आणि बोकाखत (गोलाघाट) या शहरांच्या दाट वस्तीमधून जातो. सध्याच्या महामार्गाचा एक मोठा भाग काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून अथवा उद्यानाच्या दक्षिण सीमेवरून जातो. या मार्गावरील 16 ते 32 मीटर लांबीचा प्रतिबंधित मार्ग (आरओडब्ल्यू) भौमितिकदृष्ट्या सुस्थितीत नाही. पावसाळ्यात, उद्यानाचा आतील भाग पाण्याखाली जातो. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांना उद्यानामधून सध्याचा महामार्ग ओलांडून उंच कार्बी-अँगलोंग टेकड्यांकडे स्थलांतरित व्हावे लागते. महामार्गावर दिवसरात्र सुरू असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे वारंवार अपघात होतात आणि वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो.
या आव्हानांना तोंड देण्यासाठी, या प्रकल्पात सुमारे 34.5 किमी लांबीच्या उन्नत कॉरिडॉरचे बांधकाम समाविष्ट असेल. या मार्गावरून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानापासून कार्बी-अँगलोंग हिल्सपर्यंत वन्यजीवांची हालचाल सुलभ होईल. वन्यजीवांच्या मुक्त आणि अखंड प्रवासासाठी सध्याच्या मार्गावर 30.22 कि.मी. लांबीचे उन्नतीकरणासाठी तसेच जखाबांधा आणि बोकाखात भोवती 21 कि.मी. ग्रीनफिल्ड बायपास चे बांधकाम करावे लागेल. यामुळे सध्याच्या कॉरिडॉरवरील वाहतूक कोंडी कमी होईल, सुरक्षेत सुधारणा होईल आणि गुवाहाटी (राज्याची राजधानी), काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (पर्यटन स्थळ) आणि नुमालीगड (औद्योगिक शहर) दरम्यान थेट संपर्क वाढेल.
हा प्रकल्प 2 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग (एनएच -127, एनएच -129) आणि 1 राज्य महामार्ग एसएच -35) यांना जोडेल. यामुळे संपूर्ण आसाममधील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि वहातूक केंद्रांना अखंड दळणवळण सुविधा प्रदान करेल. याव्यतिरिक्त, सुधारित कॉरिडॉर 3 रेल्वे स्थानके (नागांव, जखाबांधा, विश्वनाथ चार्ली) आणि 3 विमानतळे (तेजपूर, लियाबारी, जोरहाट) यांना जोडून मल्टी-मोडल एकत्रीकरण वाढवेल, परिणामी संपूर्ण प्रदेशात माल आणि प्रवाशांची वेगवान वाहतूक सुलभ होईल. या प्रकल्पामुळे दोन सामाजिक-आर्थिक केंद्रे, आणि आठ पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा अन्सुय भागांनी संपर्क सुधारेल, आणि प्रादेशिक आर्थिक विकास आणि धार्मिक पर्यटनाला बळकटी मिळेल.
हा विभाग पूर्ण झाल्यावर तो कालिबोर-नुमालीगड विभाग, इथल्या प्रादेशिक आर्थिक विकासात, प्रमुख पर्यटन, औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांमधील संपर्क मजबूत करण्यात, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामधील पर्यटनाला चालना देण्यात आणि व्यापार आणि औद्योगिक विकासासाठी नवीन मार्ग खुले करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. या प्रकल्पामुळे सुमारे 15.42 लाख प्रत्नयक्ष मानवी-दिवस आणि 19.19 लाख अप्रत्यक्ष मानवी-दिवस रोजगार निर्माण होईल, तसेच आसपासच्या प्रदेशात प्रगती, विकास आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी