रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याबद्दल भाजपाने रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचे अभिनंदन केले आहे.
रत्नागिरी शहरांमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे काम नगरपालिकेकडून सुरू आहे. कोकणनगर परिसरातील काही बांधकामे, साळवी स्टॉप जलतरण तलाव येथील काही अनधिकृत बांधकामे रत्नागिरी पालिकेकडून तोडण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली कारवाई यासाठी भाजपाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
रत्नागिरी शहरातील अन्य ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबतदेखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली आणि अन्य अनधिकृत बांधकामांवरदेखील कारवाई करावी, हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनाली केसरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, नितीन जाधव, राजेंद्र पटवर्धन, सचिन गांधी, राजू भाटलेकर, शैलेश बेर्डे, प्रज्ञा टाकळे, केतन कडू, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी