अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) लोकार्पणापासून हिदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हतगती महामार्ग विविध कारणामुळे वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. नियमित अंतराने होणारे अपघात, दरोडे, इंधन चोरी थाना त्या कारणाने हा मार्ग चर्चेत राहतो. आता यात गुटखा तस्करीची भर पडली आहे. समृद्धी वर काही लाख नव्हे तर तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. यांचबरोबर मालवाहू वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच तिघा आरोपीना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी अमरावती येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातीलही आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली असून एवढा मोठा साठा पाहून पोलीस देखील चकरावून गेल्याचे वृत्त आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने मेहकर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर ही कारवाई केली, स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी गोपनीय माहिती मिळाली होती, काही ईसम अशोक लेलैंड कंपनीच्या ३ ट्रक मध्ये सुगंधीत पानमसाला व गुटखा माल बाळगून त्याची चोरटी वाहतूक करीत असल्याचे कळाले. अमरावती कडून समृध्दी महामार्गाने मुंबईकडे ही वाहने जातं असल्याचे समजले जात आहे. माहितीवरून मेहकर ठाणे हद्दीत समृध्दी महामार्गावरील फर्दापूर टोलवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी गुटखा व सुगंधीत पान मसाला भरलेले २ अशोक लेलैंड कंपनीचे ट्रक अडवून पाहणी केली असता त्यात हा साठा आढळून आला. या कारवाईमध्ये दोन ट्रक चालकांसह ३ इसमाना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुध्द मेहकर पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत. मोहम्मद इम्रान मो. हफिज (वय २८ वर्षे, रा. विवाबानी मोहल्ला, अचलपूर जि. अमरावती.), अजीम बेग हाफिज बंग (वय ३६ वर्षे, रा. अन्सारनगर, अमरावती), एजाज अहेमद अजीज अहेमद (वय ३१ वर्षे, रा. शिरजगांव ता. चांदूरबाजार जि. अमरावती) अशी आरोपींची नावे आहे. या कारवाईत १.१३ कोटी रूपये किमतीचा २६४ पोत्यात भरलेला गुटखा जप्त करण्यात आला. तसेच तीस लाख रुपये किमतीचे २ अशोक लेलँड कंपनीचे ट्रक जप्त करण्यात आले. एकूण १ कोटी ४३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक प्रताप बाजड, अविनाश जायभाये, कर्मचारी शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आधाव, गणेश पुरुषोत्तम पाटील, नीलेश राजपूत, पूजा जाधव, समाधानटेकाळे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे, ऋऋषीकेश खंडेराव यांनी ही कारवाई केली. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी