नांदेड : शैक्षणिक भेटीत विद्यार्थ्यांना मिळाला जैविक अनुभव
नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत असणाऱ्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा व सुगंधी वनस्पती प्रक्षेत्र, अटकळी येथे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथील इयत्ता ९ वी वर्गातील विद्यार्थ्यां
अ


नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत असणाऱ्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा व सुगंधी वनस्पती प्रक्षेत्र, अटकळी येथे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथील इयत्ता ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना जैविक प्रयोगशाळेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतःअत्यंत उपयुक्त असणाऱ्या ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाद्वारे बीज प्रक्रिया करण्याचे महत्त्वाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. याव्यतिरिक्त, मुलांना सुगंधी वनस्पती प्रक्षेत्राची आणि त्यापासून तेल काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिस्टिलेशन युनिट बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी खूप ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक ठरला

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande