टोकियो, १ ऑक्टोबर, (हिं.स.). स्पेनचा अव्वल मानांकित टेनिसपटू कार्लोस अल्कारजने शांघाय मास्टर्समधून माघार घेतली आहे. जपान ओपन जिंकल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याने सोशल मीडियावर ही घोषणा केली.
स्पॅनिश टेनिसपटू कार्लोसने लिहिले की, या वर्षी मी रोलेक्स शांघाय मास्टर्समध्ये खेळू शकणार नाही हे जाहीर करताना मला खूप निराशा होत आहे. दुर्दैवाने, मी काही शारीरिक समस्यांशी झुंजत आहे. आपल्या टीमशी चर्चा केल्यानंतर मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकन ओपन चॅम्पियन अल्कारज पुढे म्हणाला, मी शांघायमधील टेनिस चाहत्यांसमोर खेळण्यास उत्सुक होतो. मला लवकरच परत येण्याची आणि पुढच्या वर्षी माझ्या चिनी चाहत्यांना भेटण्याची आशा आहे.
टोकियो येथे झालेल्या जपान ओपनमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात अल्काराजला घोट्याला दुखापत झाली होती. पण त्याने मनगटावर पट्टी बांधून खेळणे सुरू ठेवले आणि अंतिम फेरीत अमेरिकन टेलर फ्रिट्झचा ६-४, ६-४ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
अंतिम विजयानंतर अल्काराज म्हणाला, आठवड्याची सुरुवात माझ्या घोट्याच्या दुखापतीमुळे अडखळत झाली होती. पण मी ज्या पद्धतीने पुनरागमन केले आणि काही उत्तम सामने खेळलो याबद्दल मी खरोखर आनंदी आहे. दरम्यान अल्कारजचे हे या टेनिस हंगामातील आठवे विजेतेपद होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे