चंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी दरांमध्ये वाढीसाठी खासदारांचे आंदोलन
चंद्रपूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली प्रवेशद्वारावर सफारी दरांमध्ये वाढ केल्याच्या विरोधात थेट आंदोलन केले. खासदारांच्या आंदोलनाने पर्यटक जीप सफारी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्य
चंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी दरांमध्ये वाढीसाठी खासदारांचे आंदोलन


चंद्रपूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली प्रवेशद्वारावर सफारी दरांमध्ये वाढ केल्याच्या विरोधात थेट आंदोलन केले. खासदारांच्या आंदोलनाने पर्यटक जीप सफारी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या होत्या, परंतु व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेअंती आंदोलन मागे घेण्यात आले. परिणामी त्यानंतर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनास प्रारंभ झाला

ताडोबा प्रशासनाने कोअर आणि बफर सफारीच्या दरांमध्ये अंदाजे १,००० रुपयांची वाढ केली होती. खासदार धानोरकर यांनी भाडेवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा आधीच दिला होता. बुधवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत सर्व जीप मोहर्ली गेटवर थांबवण्यात आल्या, त्यामुळे मोठा प्रमाणात गोंधळ उडाला.अखेर ताडोबाचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी खासदारांशी चर्चा केली आणि सात दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. वाढलेले दर कमी करण्याऐवजी, स्थानिकांना आठवड्यातून एक दिवस कोअर एरिया सफारीमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती आहे.समाधानी होऊन खासदार धानोरकर यांनी आंदोलन मागे घेतले, परंतु जर सात दिवसांत आश्वासन पूर्ण केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. हा प्रस्ताव स्थानिक सल्लागार समितीसमोर ठेवला जाईल आणि त्यावर विचार केला जाईल असे समजते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande