सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्र्यांकडून नवसंजीवनी
मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलांमध्ये कलाकार, शिक्षक, वैज्ञानिक असे विविध पैलू दडलेले असतात. त्यांच्या अंगी असलेली अपार क्षमता योग्य उपचार, शिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने फुलवता आली, तर ही मुले केवळ चालूच शकतात असे
सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्र्यांकडून नवसंजीवनी


मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलांमध्ये कलाकार, शिक्षक, वैज्ञानिक असे विविध पैलू दडलेले असतात. त्यांच्या अंगी असलेली अपार क्षमता योग्य उपचार, शिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने फुलवता आली, तर ही मुले केवळ चालूच शकतात असे नाही, तर जगालाही दिशा देऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विश्वासामुळे या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक आरोग्य विभाग, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या उपक्रमाने अनेक घरांमध्ये आशेचा नवा दीप प्रज्वलित केला आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेली दहा वर्षं सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी कार्य करत आहेत. त्यांनी केवळ साहित्यच पुरवले नाही, तर वैद्यकीय उपचारांपासून ते भावनिक आधारापर्यंत या मुलांना व त्यांच्या पालकांना सर्वंकष साथ दिली आहे. या कार्यासाठी त्यांना BT-CSR एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

या फाउंडेशनने आजवर एक हजाराहून अधिक आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून आवश्यक त्या विशेष सेवा गरज असलेल्या मुलांपर्यंत पोहोचवली आहे. अनेक मुले जी आतापर्यंत चार भिंतींत अडकून पडली होती, त्यांना आता घरबसल्या उपचार व सुश्रुषा मिळत आहेत.

सातारा, वाई, पाचगणी, पाटण, तळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रांमुळे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या सेवा आज शेकडो मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आतापर्यंत ९८६ सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची नोंदणी होऊन त्यांना आवश्यक सेवा पुरवली गेली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, हा फक्त उपक्रम नाही तर समाजाच्या प्रत्येक दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे माझे ही व्यक्तिगत स्वप्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे हजारो कुटुंबांना एकटे नसल्याची जाणीव निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande