छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। डिफेन्स कॉरिडोर प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरचा समावेश व्हावा अशी विशेष मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केली.या बद्दल दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
या संदर्भात माहिती देताना मंत्री सावे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती असून त्याबाबत मोदीजींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पुणे-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित २२५ किलोमीटर लांबीच्या ६ लेन एक्सप्रेस-वे प्रकल्पावरही चर्चा झाली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा चार-पाच तासांचा प्रवास केवळ दोन तासांत होईल. या प्रकल्पासह डिफेन्स कॉरिडॉरमुळे राज्यातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला मोठी चालना मिळेल. असा विश्वासही व्यक्त केला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis