नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। ऑगस्ट महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतीतून एकाही रुपयाचे उत्पादन बाहेर येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावीअशी मागणी त्यांनी केली असता नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत केली जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीतील आहे.
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये 27 ऑगस्ट पासून अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे . या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना महापुर आला होता. बॅग वॉटरमुळेही शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीचा आणि बॅक वॉटरचा असा दुहेरी फटका नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला आहे . शिवाय अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने हजारो घरांची पडझड झाली आहे.यामुळे कामगारांच्या हाताचा रोजगार बुडाला. मजुरांनाही आता काम मिळेनासे झाले आहे . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भयाभय निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना , शेतमजुरांना , कष्टकऱ्यांना कामगारांना सावरण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज द्यावे यासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली या भेटीत त्यांनी आपली मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणावी अशी विनंती अजित दादांना केली होती. या विनंतीनुसार अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आ. चिखलीकर आणि माजी आमदार हंबर्डे यांची भेट घडवून आणली . या भेटीत आ. चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भयावह परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले .त्यानंतर नांदेड सह राज्यातील सर्वच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार आहे . दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निश्चितपणे आर्थिक मदत मिळेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis