अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)तिवसा तालुक्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या नुकसानी आणि सरकारच्या दुर्लक्षी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज तिवसा तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री यशोमती ठाकुर आणि खासदार यांनी केलं. या आंदोलनात तालुकाभरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.
हा मोर्चा सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळावरून सुरू झाला आणि घोषणाबाजी करत तिवसा तहसील कार्यालयावर पोहोचला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करीत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्यातयावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या आहेत मुख्य मागण्या
■तिवसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
■शेतकऱ्यांना सरसकट ₹५०,००० पर्यंत नुकसानभरपाई द्यावी
■शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित जाहीर करावी
■पीक विमाचे चार निकष पुन्हा लागू करावेत
■शेती खरडून गेलेल्या भागात रोजगार हमी योजनेतून कामे द्यावीत
■फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी
यावेळी वैभव वानखडे अमर वानखडे प्रणव गौरखेडे राजू थोरात सतीश पारधी जसबीर ठाकूर,कल्पना दिवे मुकुंद पुनशे,संदीप आमले लुकेश केणे रितेश पांडव पंकज मोरे निवृत्ती मोकडधम प्रदीप बोके योगेश वानखडे नंदू गोहत्रे राधेश्याम महात्मे अतुल तिखे सुरज धूमनखेडे विलास हांडे जितू ठाकूर सह अनेक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी