लोकसहभागातून आदर्श व जलसमृध्द गावाची उभारणी करा - अनुपमा नंदनवनकर
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। लोकसहभागातुन आदर्श व जलसमृध्द गावाची उभारणी करा. असे आवाहन जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) अनुपमा नंदनवनकर यांनी केले. महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
Q


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। लोकसहभागातुन आदर्श व जलसमृध्द गावाची उभारणी करा. असे आवाहन जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) अनुपमा नंदनवनकर यांनी केले.

महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड व परिसरातील बारा गावांसाठी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतस्तरीय प्रमुख भागधारका साठी जालना रोडवरील हॉटेलमध्ये आज दोन दिवसीय जलस्ञोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घघाटन अनुपमा नंदनवनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मनुष्यबळ सल्लागार एस.डब्ल्यु.नेहरी, कृषी अधिकारी रोहयो आरडी पवार उपस्थित होते.

प्रशिक्षणातील ज्ञान, कौशल्य, माहितीचा गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्याकरीता प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा उपयोग गावा करिता करा असे आवाहन अनुपमा नंदनवनकर यांनी केले. मराठवाडयात दहा ते पधरा टक्के पाऊस कमी कींवा जास्त झाल्यास कोरडा किंवा ओला दुष्काळ पडतो. हे आपल्या जलव्यवस्थापनाचे आपयश आहे, यावर्षीच्या पावसामुळे मराठवाडयातील उपजावु जमीनीचे मोठ्या प्रमाणात कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ही जमीन पुर्ववत करण्यास युध्द पातळीवर काम करावे लागेल. असे मार्गदर्शनात संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी नमूद केले.

प्रशिक्षणात मनुष्यबळ विकास तज्ञ प्रा. जयप्रकाश बागडे व भारती खरटमल यानी जल जीवन मीशन आढावा, भूजल शोध पद्धती आणि तंञे, समुदाय अधारित स्ञोत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी दुधडचे ग्रामपंचायत अधिकारी संतोष मरमठ, श्रीराम शिंदे, जी.डी.चव्हाण, अकतर पटेल यानी मनोगतात आदर्श गाव उभारण्याचा संकल्प केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande