धनुष आणि कृति सेनन यांचा ‘तेरे इश्क में’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। साऊथ सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांचा आगामी चित्रपट ‘तेरे इश्क में’ चा टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर पडली आहे. इश्क आणि बदला यांच्या
धनुष आणि कृति सेनन यांचा ‘तेरे इश्क में’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित


मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। साऊथ सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांचा आगामी चित्रपट ‘तेरे इश्क में’ चा टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर पडली आहे. इश्क आणि बदला यांच्या गहनतेवर आधारित ही प्रेमकहाणी आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केली आहे, तर चित्रपटाला संगीताचा जादूगार ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.

टीझरची झलक सांगते की हा एक ॲक्शन-रोमँटिक सिनेमा असून त्याची कथा बनारसच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात धनुष रक्ताने माखलेल्या अवस्थेत अज्ञात गुंडांशी झुंजताना दिसतो, तर दुसरीकडे कृति सेनन हळदीच्या विधीत बसलेली दिसते. खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा धनुष गंगाजलाने तिचे पाप धुवायचा प्रयत्न करतो.

२ मिनिटे ४ सेकंदांच्या या टीझरमध्ये अनेक दमदार क्षण आहेत, जे प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवण्याचं आश्वासन देतात. ए.आर. रहमानच्या सुरांनी यात खास जादू निर्माण केली आहे, जी थेट मनावर आणि विचारांवर परिणाम करते. शेवटी अरिजीत सिंगच्या आवाजाने वातावरण अधिक भावनिक होते. गीतकार इरशाद कामिल यांनी आपल्या शब्दांनी गाण्यांना अधिक खोली दिली आहे.

हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना एक आगळावेगळा सिनेमाई अनुभव देण्याचं वचन देतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande