धाराशिव जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १४ ऑक्टोबरला बैठक
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।धाराशिव जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १४ ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली असून नागरिकांना तक्रारी सादर आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी स्थापन कर
धाराशिव जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १४ ऑक्टोबरला बैठक


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।धाराशिव जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १४ ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली असून नागरिकांना तक्रारी सादर आवाहन करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक येत्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीतील भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींवर चर्चा केली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत भ्रष्टाचाराशी संबंधित विविध तक्रारी आणि निवेदनांवर विचारविनिमय केला जाईल. नागरिकांना आपल्या तक्रारी पुराव्यासह संबंधित तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे सादर करता येतील.

जर तालुकास्तरीय समितीने किंवा संबंधित विभागाने तक्रारीची दखल घेऊन योग्य कार्यवाही केली नाही, तर अशा प्रलंबित तक्रारी थेट जिल्हास्तरीय समितीसमोर मांडण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीची जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, समितीचे अशासकीय सदस्य आणि सर्वसामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande