आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी मान्यवरांची हजेरी
पुणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा
आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी मान्यवरांची हजेरी


पुणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दुगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

यावेळीराज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे,सहपोलिस आयुक्त रंजन कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील ,राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, गौरव दुगड,मोनल दुगड,आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, दुगड परिवाराने मंदिर बांधले तेंव्हापासून मी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या दर्शनाला येत आहे. नावरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण राज्याला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी देवी चरणी प्रार्थना केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रात ओल्या दुष्काळात बळीराजा सापडला आहे, या बळीराजाला लढण्याचे बळ दे हीच प्रार्थना सणाच्या निमित्ताने मी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी केली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही मदत या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला करणे शक्य आहे ती करूया, हीच मदत देवीसाठी सर्वात मोठी सेवा ठरेल.

सहपोलिस आयुक्त रंजन कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ,आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, राज्यात आज ओला दुष्काळ पडला आहे, या सणाच्या निमित्ताने संकतावर माता करण्यासाठी आपण सर्व मिळून शेतकऱ्याला मदत करूया हीच खरी प्रार्थना ठरेल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून आज माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, सध्या राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट आहे, या संकतावर मात करण्याची शेतकऱ्याला शक्ति द्यावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande