रत्नागिरी : दिव्यांगत्व निदान शिबिरांचे ३ ऑक्टोबरपासून आयोजन
रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ० ते १८ या वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन उच्च न्यायलयाच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार करण्या
रत्नागिरी : दिव्यांगत्व निदान शिबिरांचे ३ ऑक्टोबरपासून आयोजन


रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ० ते १८ या वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन उच्च न्यायलयाच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, आर. आर. पाटील यांनी दिली.

या शिबिरापासून कोणतेही गरजू व पात्र बालक वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित अंगणवाडी सेविका व विशेष शिक्षिका यांनी घ्यावी, अशा सूचना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष, व्ही. वाय. जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या आहेत.

या शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक, विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या 0 ते 18 या वयोगटातील बालकांची युनिक डिसऍबिलीटी आयडी कार्ड (UDID) करिता तपासणी करण्यात येऊन हे कार्ड वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे या बालकांना आवश्यक व पात्रतेनुसार सहाय्यक साधने वितरित करता येतील. या शिबिरात दिव्यांग बालकांसाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात येईल.

शिबिरांचे वेळापत्रक असे -

शुक्रवार 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय लांजा,

शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय राजापूर,

सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय देवरूख,

मंगळवार 7 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय गुहागर,

बुधवार 8 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजता शासकीय रुग्णालय रत्नागिरी,

गुरुवार 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कामथे आरोग्य केंद्र,

मंगळवार 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय खेड,

बुधवार 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय मंडणगड आणि

गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय दापोली.

या शिबिरात बालकांना आणण्यापूर्वी लांजा व राजापूर तालुक्यातील दिव्यांगांनी ग्रामीण रुग्णालय पाली, गुहागर तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय गुहागर, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे, खेड व मंडणगड तालुक्यांकरिता उपजिल्हा रुग्णालय खेड, दापोली तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली आणि रत्नागिरी तालुक्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी याप्रमाणे www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करताना सेंटरची निवड करावयाची आहे.

नावनोंदणीकरिता काही अडचण आल्यास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी (9834440200) येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क करावा. तपासणीकरिता सोबत संकेतस्थळावर नावनोंदणी केल्याची प्रत, आधार कार्ड प्रत, आधार कार्ड लिंक असलेला मोबाइल क्रमांक, जिल्ह्यातील रेशनकार्ड, पासपोर्ट साइज फोटो सोबत घेऊन यावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande