छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। निसर्गाचा कहर आणि महापुराचे थैमान असतानांही कलावंताच्या अदाकारीने ओतप्रोत भरलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप झाला. विद्यापीठ मुख्य परिसरात आयोजित या महोत्सवात चार जिल्हयातून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी झाले. समारोप व बक्षीस वितरण सभारंभास प्रख्यात अभिनेते वैभव मांगले, माजी विद्यार्थी तथा कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर यांची प्रमुख् अतिथी म्हणून उपस्थिती होती.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाटयगृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, व्यवस्थापन परिषद सदस्य व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.गौतम पाटील, डॉ.व्यंकटेश लांब यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रख्यात कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले, कला महाविद्यालयात शिकत असताना आपली ही जडणघडण झाली. मुंबई सारख्या महानगरात जाऊन स्वतःला येत असलेली कला अत्यंत मनलाऊन जोपसली विद्यार्थ्यांनी ही स्वतःला जे येते ते प्रामामिकपणे व कष्टाने करा, यश निश्चित मिळेल.
खेडयातल्या माणसाला शहरात जायचय, शहरातील लोकांना महानगरात तर मोठया शहरातील मंडळींना विदेशात जायचे आहे, हा पैशा मागे लागण्याचा हव्यास आपण टाळायला हवा, असे आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी युवा कलावंताना केले. तर घरात वागण्यापासून ते रस्त्यावरील वाहनापर्यंत असलेली बेशिस्त टाळून चालतात तरच पुढे जाल, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रयोगशील, उपक्रमशिल व सतत कार्यरत ठेवावे, असा सल्लाही त्यांनी शिक्षकांना दिला. यावेळी ’नया है वह’ हा डायलॉगही रसिकांना ऐकवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis