नाशिक, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
जिल्ह्यासह शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. त्याचप्रमाणे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान व पशुधनाची हानी झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरीला नदीला पूर आला होता. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर पूर ओसरला आहे. या पूरामुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे दुतोंड्या मारूती पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी गोदाकाठालगत असलेल्या भांडी बाजार, सराफ बाजार, तसेच कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV