- फ्रंट लोड वॉशिंग मशीनमध्ये ‘टर्बिडिटी सेन्सिंग’ फीचर; सणासुदीत 40% वाढीचे लक्ष्य मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन नवोपक्रमशील तंत्रज्ञान सादर करण्याच्या आपल्या परंपरेला पुढे नेत गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या (जीईजी) अप्लायन्सेस बिझनेसने एआय-पॉवर्ड टर्बिडिटी सेन्सिंग टेक्नॉलॉजीसह नवीन फ्रंट लोड वॉशिंग मशीन श्रेणी बाजारात आणली आहे. ही टेक्नॉलॉजी कपड्यांमध्ये राहणारे अतिरिक्त डिटर्जंट 50% पर्यंत कमी करण्यात मदत करते. त्यामुळे कपडे अधिक काळ टिकतात, रंग व पोत खराब होत नाहीत आणि त्वचेची सुरक्षितताही राखली जाते. या वॉशिंग मशीनमध्ये पाण्याची पातळी व लोड सेन्सिंग, ऑटो ड्रम बॅलन्सिंग, फोम डिटेक्शन, स्पिन स्पीड ऑप्टिमायझेशन आणि ऑटो टब क्लीन रिमाइंडर्स यांसारखी अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. भारतातच डिझाइन व उत्पादन झालेली ही मालिका अधिक कार्यक्षम व शाश्वत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गोदरेज अप्लायन्सेसचे वॉशिंग मशीन्स उत्पादन गट प्रमुख मनीष शर्मा म्हणाले,“कपड्यात राहणारे डिटर्जंट ही सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे. आमचे एआय-चलित टर्बिडिटी सेन्सिंग तंत्रज्ञान ही समस्या कमी करून ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्यात सुलभता आणेल. हा नवोपक्रम म्हणजे ग्राहककेंद्रित, उद्देशपूर्ण आणि टिकाऊ तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना आहे.” या नवीन मालिकेसह कंपनीने फ्रंट लोड, टॉप लोड आणि सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन विभागात पोर्टफोलिओ विस्तार केला आहे. सणासुदीच्या निमित्ताने 4 वर्षांपर्यंत विस्तारित वॉरंटी, सोपे ईएमआय व कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या धोरणात्मक रोलआउटसह गोदरेजने सणांच्या हंगामात एकूण वॉशिंग मशीन विभागात 40% आणि प्रीमियम फ्रंट लोड विभागात 60% वाढीचे लक्ष्य निश्चित केले आहे. गोदरेजची एआय-पॉवर्ड वॉशिंग मशीनची ही नवीन श्रेणी संपूर्ण भारतातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्स व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, याची किंमत 51,000 पासून सुरू होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule