अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। परंपरा व प्रथेनुसार श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने उद्या गुरुवार 2 ऑक्टोबर 2025,रोजी सकाळी 9 वाजता डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र शिवाजीनगर अमरावती येथे सोने समर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री,कर्मयोगी गाडगेबाबा आणि शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला विजयादशमी निमित्त सोने अर्पणाचा कार्यक्रम श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेचे सचिव डॉ.वि.गो ठाकरे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी