मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे.
हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर