नांदेड - धम्मदीक्षा वर्धापन महोत्सवानिमित्त भव्य महावंदना समारोह
नांदेड, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी, दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांच्या साक्षीने घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त, नांदेडकरांच्या वतीने म
नांदेड - धम्मदीक्षा वर्धापन महोत्सवानिमित्त भव्य महावंदना समारोह


नांदेड, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी, दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांच्या साक्षीने घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त, नांदेडकरांच्या वतीने महावंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून, महाविहार बावरीनगर तसेच संपूर्ण नांदेड वासीयांच्या वतीने, श्रद्धेय भिक्खु संघाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य महावंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशनसमोर, नांदेड येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ५.४५ वाजता, श्रद्धेय भिक्खु संघाच्या उपस्थितीत भव्य महावंदना कार्यक्रम संपन्न होणार आहे. ठरलेल्या वेळी पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande