कोस्मेसोबत सहकार्य करणारे पीसीयू पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ - हर्षवर्धन पाटील
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्राला २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. या करारामुळे तरुणांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, संशोधन आणि औद्योगिक संधी मिळणार असून हे ध्येय साध्य करण्यासाठी हा करार नक्कीच प्रेरक ठरेल.
कोस्मेसोबत सहकार्य करणारे पीसीयू पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ - हर्षवर्धन पाटील


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्राला २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. या करारामुळे तरुणांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, संशोधन आणि औद्योगिक संधी मिळणार असून हे ध्येय साध्य करण्यासाठी हा करार नक्कीच प्रेरक ठरेल. पीसीयू हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ असून कोस्मेसोबत ऐतिहासिक करार केला ही अभिमानास्पद बाब आहे. अशा आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे पीसीयूच्या विद्यार्थ्यांना कोरियन कंपन्यांमध्ये संधी मिळतील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि दक्षिण कोरियाच्या कोरियन एसएमई (कोस्मे) यांच्या मध्ये सोमवारी (२९ सप्टेंबर) पीसीयू साते मावळ येथे सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात कोरिया फॅसिलिटेशन सेंटरचे तसेच कोस्मे ट्रेनिंग प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोस्मेचे चेअरमन जे क्युंग ली, पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री व नुतन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू अभ्यास मंडळ सदस्य सचिन इटकर, पीसीयूचे प्रभारी कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पीसीयू उद्योग संस्था संवाद संचालक डॉ. प्रणव चारखा आदी उपस्थित होते.

दक्षिण कोरियाने शैक्षणिक, तांत्रिक, औद्योगिक प्रगती केली आहे. कोस्मे - पीसीयू यांच्या मध्ये झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना हे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पीसीयू व दक्षिण कोरिया यांच्यातील विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांना चालना दिली जाईल. कोरियन भाषा शिक्षण सुरू करण्यासाठी सहाय्य करून दक्षिण कोरियातील विद्यापीठांशी थेट संवाद साधण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. पीसीयू आणि दक्षिण कोरिया शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्यात येईल, असे प्रतिपादन दक्षिण कोरियाचे वाणिज्य दूत यू डोंगवान यांनी केले.

जे क्युंग ली म्हणाले, या सहकार्यामुळे विद्यार्थी व तरुणांना कोरियन एसएमई सोबत प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध होतील. तसेच कोरियन एसएमईंना महाराष्ट्रात विस्तारासाठी मार्गदर्शन, कार्यालयीन सुविधा व कायदेशीर सहाय्य, भारत व कोरिया येथील स्टार्टअप्सना विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य मिळेल. सांस्कृतिक आदान प्रदानामुळे परस्पर समन्वय वाढेल आणि दीर्घकालीन भागीदारीस चालना मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande