मंत्रालयात कंकालेश्वर मंदिर जतन दुरुस्तीचा कामांचे सादरीकरण
बीड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कंकालेश्वर मंदिर (जि. बीड) व श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय, औंध (जि. सातारा) या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण मंत्रालय येथे करण्यात आले. बी
कंकालेश्वर मंदिर,बीड


बीड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कंकालेश्वर मंदिर (जि. बीड) व श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय, औंध (जि. सातारा) या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण मंत्रालय येथे करण्यात आले.

बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, दूरदृश्यप्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande