उबाठाचा मेळावा म्हणजे कावळ्यांचा हसरा मेळावा : डॉ. ज्योती वाघमारे
सोलापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। उबाठा गटाकडे सध्या एका विमानात बसतील एवढेच कार्यकर्ते शिल्लक आहेत. संजय राऊतांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोनिया गांधीच्या पायात गहाण टाकला होता. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धाडसी निर्णय घेत हिंदुत्ववादी विच
उबाठाचा मेळावा म्हणजे कावळ्यांचा हसरा मेळावा : डॉ. ज्योती वाघमारे


सोलापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। उबाठा गटाकडे सध्या एका विमानात बसतील एवढेच कार्यकर्ते शिल्लक आहेत. संजय राऊतांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोनिया गांधीच्या पायात गहाण टाकला होता. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धाडसी निर्णय घेत हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना वाचवण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्ववादी विचारांचा, मावळ्यांचा दसरा असेल. उबाठाचा मेळावा म्हणजे कावळ्यांचा हसरा मेळावा असेल, अशी टीका शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

वाघमारे म्हणाल्या, आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. दसरा मेळाव्यातून निवडणुकांमध्ये यशस्वी होण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कानमंत्र देतील. उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्ष गहाण टाकला आहे. दोन्ही भाऊ एकत्र येणार हे जसे राऊत सांगत आहेत, तसेच त्यांनी दोन्ही भाऊ वेगळे का झाले, मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी का फोडली याचे स्पष्टीकरण द्यावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande