बीडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या केटवेअर गेटचे दरवाजे बसवणार
बीड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या विविध भागात जलसंपदा विभागाच्या केटवेअरचे दरवाजे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली आणि दरवाजे पुनर्स्थापित करण्याची मागणी केली
अ


बीड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या विविध भागात जलसंपदा विभागाच्या केटवेअरचे दरवाजे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली आणि दरवाजे पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. त्यावर मंत्री महोदयांनी देखील या मागणीला त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन खरेदीस मान्यता दिली.

आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) या तिन्ही तालुक्यांमधील जलसंपदा, जलसंधारण प्रकल्प आणि जिल्हा परिषदेच्या मालकीतील अनेक केट वेअरच्या दरवाजे अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. याप्रसंगी, १५ ऑक्टोबर नंतर या गेटांची पुनर्स्थापना सुरू करण्याची आवश्यकता असल्यामुळे तात्काळ ७ दिवसांच्या कालावधीत निविदा काढून नवीन गेट खरेदी करण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार सुरेश धस यांनी केली.

याचबरोबर, शिरूर (कासार) तालुक्यातील घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्पाचे तलाव किना नदीला आलेल्या पुरामुळे गंभीर नुकसान झाले आहे. या तलावाची की-वॉल पुढे वाढवून दोन्ही संरक्षण भिंती उभारणे, कॅनॉलची दुरुस्ती करणे आणि माळेगाव चखला गावापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली. यासंबंधीचे सविस्तर अंदाजपत्रक मागविण्यासाठी तात्काळ आदेश मंत्री महोदयांनी दिले आहेत. अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande