पुणे - युनिट मुख्यालय कोटा सैनिक तांत्रिक भरती मेळाव्याचे आयोजन
पुणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - सेना चिकित्सा संगठन प्रशिक्षण केंद्र एवं कॉलेज, लखनऊ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत सन २०२५-२६ साठी सैनिक तांत्रिक (नर्सिंग असिस्टंट) पदाकरिता भरती मेळावा दिनांक ०४ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित
पुणे - युनिट मुख्यालय कोटा सैनिक तांत्रिक भरती मेळाव्याचे आयोजन


पुणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - सेना चिकित्सा संगठन प्रशिक्षण केंद्र एवं कॉलेज, लखनऊ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत सन २०२५-२६ साठी सैनिक तांत्रिक (नर्सिंग असिस्टंट) पदाकरिता भरती मेळावा दिनांक ०४ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

ही भरती सर्व्हिसमन, माजी सैनिक , युद्ध विधवा, विधवा तसेच सेवारत जवानांचे खरे भाऊ, माजी सैनिक आणि संरक्षण सुरक्षा कोर कर्मचाऱ्यांचा मुलगा, बंधू (जे सेना चिकित्सा संगठन मधून निवृत्त झालेले आहेत) यांच्यासाठी राहणार आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत uhq2025@joinamc.in या ई-मेल आयडीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना तात्पुरत्या स्वीकृतीबाबत ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल. सूचित केलेल्या दिवशी उमेदवारांनी सेना चिकित्सा संगठन स्टेडियम, लखनऊ-रायबरेली रोड येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande